सी-लिंक प्रॉपर्टी

FUTURE PROPERTIES FOR BETTER LIFESTYLES

सी-लिंक प्रॉपर्टी ने रिअल इस्टेट उद्योगातील महत्वाच्या कंपन्यांमध्ये स्वताचे स्थान निर्माण केलेले आहे. आमचा मुळ उद्देश आहे, तो म्हणजे कुठेही काम करीत असलो तरी सातत्यपूर्ण व पर्यावरण सह उन्नत जीवनशैली पुरविणे. एक जबाबदार कॉर्पोरट नागरिक म्हणून सातात्यापुर्ती हा आमच्या धोरणांचा अंतर्गत भाग आहे. भारतात आदर्शवत आणि जागतिक दर्जाच्या मालमत्तांचा विकास करून बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी बनण्याचा आमचा मानस आहे.

आमचे ध्येय - सातत्यपूर्ण नवनवीन कल्पनांसह दर्जेदार घरे पुरवून आमच्या ग्राहकांच्या जीवनात आनंद फुलविणे

आमची दूरदृष्टी - प्रिमिअम हौसिंग मध्ये सर्वाधिक पसंतीचा ब्रांड बनणे घरे पुरविणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी बनणे.

गुणवत्ता धोरण - आमच्या ग्राहकांचे जीवनमान उंचावून आम्ही त्यांना आनंद देण्यासाठी कटिबद्ध आहोत आमच्या कर्मचार्यांना आणि लाभधारकांना सहभागी करून घेऊन आम्ही सतत आमच्या प्रक्रिया सुधारू आणि नैतिक आचरण करू आमच्या उद्योगाला लागू असलेल्या वैधानिक आणि नियामक मान्कांपेक्षाही अधिक चांगले काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

आमची मुल्ये - आम्ही नेहमीच मुल्यांवर चालणारी संस्था बनण्याचा प्रयत्न केलेला आहे. हि मूल्येच समूहाची वृद्धी आणि व्यवसायाची प्रेरणास्तोत्र बनत राहिलेली आहेत. जी सहा मुलभूत मुल्ये लक्षात ठेऊन आम्ही व्यवसाय करतो ती अशी आहेत -

१. ग्राहकांवर लक्ष केंद्रित - संस्थेत ग्राहकांची मध्यवर्ती भूमिका अंतर्गत आणि बाह्य ग्राहक व पुरवठादार संबंध.

२. नाविन्यपूर्ण कल्पना - आमच्या ग्राहकांच्या मनात पहिली आठवण जागविण्यासाठी आम्हीआमची उत्पादने आणि सेवा इतरांपेक्षा वेगळ्या कशा असतील यावर लक्ष केंद्रित करतो ग्राहक कर्मचारी आणि इतर लाभार्थी यांनी पुढाकार घेऊन उत्पादने आणि सेवा यांमध्ये स्पर्धात्मकता ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो

३. चपळता - ग्राहकांच्या व इतर लाभार्थींच्या गरजांना त्वरित प्रतिसाद यात जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आमची कृती / दिशा बदलणे याचा समावेश होतो

४. गुणवत्ता - लाभार्थींना आनंदी ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार गुणवत्तेची हमी देणे

५. नेतृत्व - रचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना या बाबतीत या उद्योगातील नेतृत्व करण्याचा मानस या संवर्गात बेंचमार्क मानके (स्टॉंर्ड्स) निर्माण करून बाजारपेठेचे नेतृत्व करण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे

६. प्रामाणिकपणा - आपण आपला व्यवसाय रास्तपणे प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे केलाच पाहिजे. आपण जे काही करतो ते जनतेच्या पसंतीस उतरलेच पाहिजे. निर्णय वस्तुस्थितीवर आधारित असलाच पाहिजे. आपल्या कामातून उच्च प्रतीचे व्यावसायिक वर्तन दिसून येते.

उद्देश - आमचा उद्देश आम्ही ज्या समाजाच्या गटाची सेवा करतो त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. आम्ही वटक आणि अब्री यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व करीत असतो ज्यात हा समूह क्षमतांच्या विशेष संचांचा वापर करतो
पारदर्शक आणि सहभागाची संस्कृती हीच सी-लिंक प्रॉपर्टीच्या मुल्यांचा पाया आहे

केवळ सात बेटं ऐकमेकांना जोडून तयार झालेली आजच्या मुंबईला विस्तारण्यासाठी वाव नसल्यामुळेच मुंबईकर विरार, बदलापूर, अंबरनाथ, पनवले इथपर्यंत फेकला गेला. वास्तविक मुंबईतच राहण्याची त्याची संधी अनेकांच्या दृष्टीत आली नाही. म्हणूनच शिवडीपासून अवघ्या 15 मिनिटांत न्हावा-शेवापर्यंत जाणारा सागरी सेतू बांधला गेला तर नक्कीच आज दीड-दोन तास प्रवास करून मुंबईत येणारा माणूस अवघ्या अर्ध्या तासात इथं पोहचू शकेल आणि त्याला त्याचे स्वतःचे घर मुंबईतच असल्याची पर्वणीदेखील मिळणार आहे.

मुंबई आणि नवी मुंबई ला थेट जोडणारा प्रस्तावित ब्रीज म्हणजे शेवडी न्हावा शेवा सी-लिंक मुळात शेवरी हे मुंबईतल महत्वाच उपनगर आहे. दक्षिण मुंबई तसाच सर्व उपनगर यांना आणि पश्चिम उपनगर यांना जोडणारा इस्ट्न फ्री वे शेवरीवरून जतो. शेवडी न्हावा शेवा सी-लिंक शेवरीच महत्व वाढेलच त्याचबरोबर नवी मुंबई आणि यातही उरण,उलवे,द्रोणागिरी,चिरले,या भागांची भरभराट होईल..हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर महामुंबईचा विकास सुरू होईल. त्याप्रमाणे इथे गुंतवणूक, निवासी संकुलं, औद्योगिक वसाहती, पर्यावरणीय प्रकल्प अशा अनेक गोष्टी साकारल्या जातील. त्यादृष्टीनेच सी-लिंक प्रॉपर्टी हे विकास नियोजनाची टिपणं यानिमित्ताने तयार करणार आहे.

मुख्य भूभाग व मुंबई बेट यांना जोडणारा एक नवीन मार्ग उपलब्ध होईल.मुख्य भूभागातील अंतर्भाव खुला झाल्याने तेथील विकासास चालना मिळेल.मुंबई व मुख्य भूभाग यामधील वाहतुकीचे अंतर व परिचालन खर्च कमी होईल.मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांवरील व सार्वजनिक वाहतूक सुविधांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल.मुंबई बेटाच्या सर्वसाधारण पर्यावरण परिस्थितीत सुधारणा घडून येईल.

सी-लिंक प्रॉपर्टी चे संचालक श्री.के डी सर - यांनी सांगितले की, आगरी-कोळ्यांचे मासेमारीचे गाव अशी ओळख असलेल्या उरणला आता मोठ्या शहराचा दर्जा मिळणार आहे. उरण परिसरातील 100 चौरस किलोमीटर जागेवर (10 हजार हेक्‍टर) खासगी व सार्वजनिक भागीदारीतून नवे शहर विकसित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. तेथे विविध गृहनिर्माण प्रकल्प तसेच पायाभूत सुविधा उभारण्याकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) ब्लूप्रिंट तयार करण्यास सरकारने सांगितले आहे. सरकारने तयार केलेल्या प्रस्तावानुसार हे नवीन शहर मुंबईच्या एक चतुर्थांश एवढे, तर नवी मुंबईच्या एक तृतीयांश एवढे असेल. नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आज 162 चौरस किलोमीटर इतका परिसर आहे. गृहनिर्माण तसेच इतर क्षेत्रांच्या वाढीकरिता या नवीन शहराची निर्मिती एक चांगले पाऊल मानले जाते. मुंबई आणि नवी मुंबईत जागेची कमतरता भासत असल्याने हे नवीन शहर विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्याला सी लिंक एक्सपो फार मोठा हातभार लावणार आहे. हे तिसरे शहर उभारण्याकरिता खासगी क्षेत्राचा यातील सहभाग सर्वात महत्त्वाचा असणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळेच त्यांच्या सहभागाची माहिती जनतेपर्यंत या उपक्रमातून पोहचेल. या उपक्रमात विविध खासगी उद्योग संस्थांनीही आपला सहभाग दिला आहे. एबीआरआय म्हणजे असोसिएशन ऑफ बिल्डर्स अँड रिअल्टर्स ऑफ इंडिया या अग्रगण्य संस्थेचेही या उपक्रमाला पाठबळ मिळालेले आहे.

विशेष म्हणजे या नवीन शहराचा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणात समावेश करण्याचाही सरकार विचार करीत आहे. त्यामुळे या नवीन शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासोबतच तेथे चांगली वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएसारख्या प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. नवी मुंबईत येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसारख्या प्रकल्पांच्या यशावर या शहराची भावी घोडदौड अवलंबून राहणार आहे. विशेषतः हा परिसर खाडीव्याप्त असल्याने वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून देताना तेथे मोठ्या प्रमाणात जलवाहतुकीचा पर्याय उभारता येऊ शकतो. त्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) मदत घेता येऊ शकेल.

इतर क्षेत्रातील आमची प्रगती

95%
रिअल इस्टेट - प्लॉटस
85%
पायाभूत सुविधा
90%
गुंतवणूक

कस्टमर / ग्राहक अभिप्राय

सी-लिंक प्रॉपर्टीचे प्रमुख भागीदार / पार्टनर